Friday, March 29, 2024

/

सोमवारी कोरोनाचा आणखी एक बळी

 belgaum

कोरोनाचा कहर सोमवारी देखील तसाच असून आणखी एक महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.कोरोना पीडित असलेली अथणी तालुक्यातील आणखी एक महिला मरण पावली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला असून बेळगावातील कोरोना मूळे मयत झालेल्यांची संख्या सात वर पोहोचली आहे. कोरोनाचा कहर खऱ्या अर्थाने बेळगावला सोसावा लागत आहे.

रविवारी रायबाग कुडची आणि वीरभद्र नगर बेळगाव येथील इसमाचा मृत्यू झाला होता त्या नंतर सोमवारी एक बळी गेला आहे.बेळगाव जिल्ह्यात सध्या 74 जण ऍक्टिव्ह केस असून कोविड वार्डात आयसोलेशन मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 belgaum

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जनतेने देखील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.मास्क न घालता अनेकजण बाजारात बिनधास्त फिरत असलेले दृश्य बेळगावात पाहायला मिळत आहे.मास्क वापरला नाही तर पोलीस आणि मनपाने कठोर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.शेवटी कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर जनतेने नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.