Thursday, April 25, 2024

/

राज्यातील बाधितांची संख्या झाली 55,115 : जिल्ह्यात आणखी 4 जणांचा मृत्यू

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 21 झाली आहे. दरम्यान, कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 3,693 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 55,115 इतकी झाली आहे. राज्यात आज आणखी 115 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 1,147 इतका झाला आहे.

बेळगाव जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने 95 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 789 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 391 असून आणखी 4 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा आकडा 21 झाला आहे. आज हॉस्पिटलमधून एकही रुग्ण डिस्चार्ज झाला नसल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 377 इतकी स्थीर आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 17 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 3,693 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 55,115 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 33,205 असून यापैकी 568 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शुक्रवारी 1,028 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे राज्यभरात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 20,757 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 115 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,147 झाली असून यापैकी 6 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2208 रुग्ण – एकूण रुग्ण 27496), धारवाड (157-1731), बेळ्ळारी (133-2200) आणि बेळगाव (95-789).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.