Wednesday, April 24, 2024

/

आमदार व माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित

 belgaum

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कुटुंबातील आणखी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदारांच्या मुली वपत्नी पॉजिटिव्ह आली असून स्वतः त्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्यामुळे सध्या ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

आता त्यांच्या कुटुंबातील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून पोलीस अधिकारी सतत रस्त्यावर उभे राहून कोरोना विरुद्धच्या लढाईत सेवा बजावत आहेत. आता पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, कॅमेरामन आदींना कोरोनाची बाधा होऊ लागली आहे.

 belgaum

गोंधळी गल्लीत रहाणाऱ्या  माजी महापौरांच्या पतीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे एकूणच बेळगाव शहरात कोरोनाचा सामुहिक संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोनाने सर्वच थरातील लोकांना ग्रासले आहे.

बेळगावात लॉकडाउन करणार का? उद्याच्या शासकीय बैठकीकडे बेळगावकरांच लक्ष.

बेळगावचे जिल्हाधिकारी उद्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जिल्हातील वाढत्या कोरोना रुग्णावर लोकप्रतिनिधींची संवाद साधणार आहेत. पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली कोविड नियंत्रण बैठक होणार आहे सोमवारी 20 जुलै रोजी सकाळी बैठक संपन्न होणार आहे. पण यावेळी सर्वांचं लक्ष लॉकडाउनसंबंधीच्या निर्णयाकडे असणार आहे.बेळगावचे जिल्हाधिकारी नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शहरातील वाढत्या कोरोना महामारीच्या संकटात लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच, काही वेळा लोक नियम पाळत नसतील, तर लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावा असे बेळगावातील विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदन शासनाला देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.