Monday, May 13, 2024

/

‘उत्तर आमदार बेनके यांच्यात कोरोनाची लक्षणे’

 belgaum

गेल्या चार महिन्या पासून बेळगाव शहर पिंजून काढणाऱ्या आणि कोरोना काळात लोकांना धीर देणाऱ्या उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्याने त्यांचे घरात विलगीकरण करण्यात आले आहे.

लॉक डाऊन उठल्या नंतर आमदार बेनके अनेकदा बंगळुरूला जाऊन आले होते त्यांनी जनतेला धीर देण्याचा मदत कार्याचा सपाटा लावला होता कालच त्यांचा वाढ दिवस झाला होता वाढ दिनाच्या निमित्ताने देखील ते कुणाला भेटले नव्हते.

उत्तर भागांत जनसंपर्क दांडगा असणाऱ्या बेनके यांच्यामुळे कोरोना काळातही उत्तर मतदार संघातील जनतेला एक मोठा दिलासा वाटत होता या पाश्वभूमीवर आमदारालाच कोरोनाची लक्षणे  दिसल्याने मतदार संघात निराशेचे वातावरण आहे.

 belgaum

बेनके यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने विशेष काळजीची बाब नाही असे सूत्रां कडून समजते तरी देखील आपण घरी सुरक्षित आहोत कार्यकर्त्यांनी आणि जनतेने योग्य काळजी बाळगावी असे आवाहन त्यांनी घरातून केलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.