Thursday, March 28, 2024

/

मंगळवारी शहरात विविध ठिकाणी बत्ती होणार गुल.

 belgaum

मंगळवारी शहरात विविध ठिकाणी विज गुल. वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली वीज कपात करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका पत्रकात हेस्कॉमच्या वतीने केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असून मंगळवार दिनांक 9 रोजी शहरातील विविध भागात सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत वीज कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन हेस्कॉमच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवारी कॅम्प, एम एच रोड, आर ए लाईन, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, नानावाडी, आश्रयवाडी, गोवावेस रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड हिंदवाडी, खानापूर रोड, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, पै हॉटेल, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, शास्त्रीनगर, एम एफ रोड, छत्रपती शिवाजी रोड, न्यू गुडशेड रोड,

आगरकर रोड, छत्रपती शिवाजी रोड, रॉयल रोड, गणपत गल्ली, काँग्रेस रोड पहिले व दुसरे रेल्वे गेट मराठी कॉलनी, काँग्रेस विहीर, लेले मैदान, व्हॅक्सिंग डेपो, राणाप्रताप रोड, नेहरू रोड, रॉयल रोड हुलबते कॉलनी, शहापूर खडेबाजार कचेरी गल्ली कोरे गल्ली रेल्वेस्थानक रेडिओ कॉम्प्लेक्स पाटील गल्ली टिळक चौक देशपांडे गल्ली यासह इतर ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

 belgaum

त्यामुळे मंगळवारी संपूर्ण दिवस वीज गुल होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन हेस्कॉमच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.