Friday, April 19, 2024

/

राज्यांची संख्या झाली 6,824 : नव्याने आढळले 308 रुग्ण

 belgaum

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची संख्या एकूण 6,824 इतकी झाली आहे. सध्या सर्वांना मागे टाकत उडुपी जिल्हा एकूण 1,005 रुग्णांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 81 झाले आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 12 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 13 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 308 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6,824 झाली असून नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 25 आंतरराष्ट्रीय, तर 208 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे.

राज्यातील 6,824 कोरोनाग्रस्तांपैकी 3,648 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,092 असून यापैकीभ 15 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 3 मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 81 झाली असून यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात आणखी 14 रुग्ण आढळून आल्यामुळे सध्या राज्यात सर्वाधिक 1,005 रुग्णांसह हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. चामराजनगरचा अंतर्भाव झाल्याने कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 झाली असून या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. उडपी (आज 14 रुग्ण – एकूण रुग्ण 1005), कलबुर्गी (67 -883), यादगिरी (52 -787), बिदर (42 -350), बेंगलोर शहर (31 – 648), मंगळूर (30 -263), धारवाड (20 -111), हासन (11 -236), बेळ्ळारी (11 -179), विजयपुरा (6 -228), रायचूर (5 -383), कारवार (5 -108), कोलार (4 -41), दावणगिरी (3 -226), मंड्या (2 -338), हावेरी (2 -24), म्हैसूर (1 -114), बागलकोट (1 -100), रामनगर (1 – 16), बेळगाव (0 -303), चिकबळ्ळापूर (0-152), शिमोगा (4 -89), चित्रदुर्ग (0 -40), गदग (0 -49), चित्रदुर्ग (0 -43), तुमकुर (0 -41), बेंगलोर ग्रामीण (0 -37), चिक्कमंगळूर (0 -19), कोप्पळ (0 -13), कोडगु (0 -3) आणि चामराजनगर (आज 0 रुग्ण- एकूण रुग्ण 1). याखेरीज 34 जण राज्याच्या अन्य भागातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.