Thursday, March 28, 2024

/

राज्यात मृतांच्या संख्येने केले शतक पार : बाधितांची संख्या 7,734

 belgaum

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून काल सायंकाळीनंतर राज्यात आणखी 204 रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 17 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 7,734 इतकी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आणखी 8 जण मृत्युमुखी पडल्याने मृतांच्या संख्येने शतक पार केले आहे. बेळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या 24 तासात एकही रुग्ण आढळून आला नसल्यामुळे रुग्णांची संख्या 307 इतकी स्थिर आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 16 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 17 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 204 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 2 आंतरराष्ट्रीय, तर 106 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,824 असून यापैकी 72 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,804 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 106 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील 30 जिल्हे कोरोनाग्रस्त असून या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 55 रुग्ण – एकूण रुग्ण 827), यादगिरी (37 -865), बेळ्ळारी (29 -279), कलबुर्गी (19 – 1026), बिदर (12 -395), मंगळूर (8 -378), धारवाड (8 -171), मंड्या (7 -350), हासन (5 -248), उडपी (4 -1039), बागलकोट (4 -111), शिमोगा (4 -105), दावणगिरी (3 -230), चिकबळ्ळापूर (3-155), कारवार (3 -123), रायचूर (1 -410), म्हैसूर (1 -119), बेंगलोर ग्रामीण (1 -39), बेळगाव (0 -307), विजयपुरा (0 -236), गदग (0 -53), कोलार (0 -48), चित्रदुर्ग (0 -43), तुमकुर (1 -42), हावेरी (0-27), रामनगर (4 – 25), चिक्कमंगळूर (4 -23), कोप्पळ (0 -21), कोडगु (0 -3) आणि चामराजनगर (आज 0 रुग्ण- एकूण रुग्ण 1). याखेरीज इतर 35 रुग्णांमध्ये परराज्यातील रुग्ण आणि परदेशातून आलेल्या काॅरन्टाईन प्रवासी रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.