Thursday, April 18, 2024

/

डिसेंबर पूर्वी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करा

 belgaum

बेळगाव रेल्वे मंत्री यांनी घेतली रेल्वेच्या कामाची माहिती बेळगावच्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे  कामकाज  सुरु आहे.  ह्या कामकाजाच्या ठिकाणी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी भेट देऊन प्रगती आढावा घेतला.  कामकाजाविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन  सल्ला सूचना दिल्या.

महात्मा गांधींची  भेट  , महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली १९२४ रोजी झालेले राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन, स्वातंत्र्य  लढ्यात दिलेले प्राणाचे बलिदान अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. बेळगावची वाढती लोकसंख्या आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन , बेळगाव रेल्वे स्टेशनमध्ये  नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Railway mos visits station
Railway mos visits station

लॉक डाउन काळात दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या रेल्वे स्थानकाचे  नूतनीकरण कामकाज पुनः सुरु करण्यात आले असून काम वेगाने सुरु आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेडकडून हे कामकाज सुरु आहे. गुरुवारी, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी कामकाजाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली . अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन , सल्ला सूचना दिल्या.
या वेळी  मंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले, बेळगाव रेल्वे स्थानक हे इतिहासाचा साक्षीदार असलेले रेल्वे स्थानक आहे. ह्या रेल्वेस्थानकाचा विकास करण्याचे खूप दिवसांचे स्वप्न होते. आता ते साकार होत आहे. आणखी एका प्लॅटफॉर्मचे आधुनिकीकरण करुन त्या ठिकाणी हॉटेल, मार्केट  उपलब्ध करुन देणार आहे. महात्मा गांधींनी भेट दिलेल्या इतिहासाची आठवण म्हणून ह्या रेल्वे स्थानकाची पुन्हा रचना करण्याची योजना, तंत्रज्ञ आणि योजनाकारानी आखली आहे.  माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या वाढदिवशी २५ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.