Friday, March 29, 2024

/

झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या : राज्याची 5 हजाराच्या दिशेने वाटचाल

 belgaum

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 5 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 515 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 4,835 इतकी तर बेळगाव जिल्ह्याची 252 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 4 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 5 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आढळून आलेल्या 515 कोरोनाबाधितांमध्ये 1 आंतरराष्ट्रीय, तर 482 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यातील 4,835 कोरोनाग्रस्तांपैकी 1,688 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 3,088 असून यापैकी 13 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यूची एकही घटना घडली नसल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 57 इतकी स्थिर आहे. यापैकी दोघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सर्वाधिक 204 रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकातील एकूण 29 जिल्हे कोरोनाग्रस्त असून सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये उडपी (आज 204 -एकूण 768), कलबुर्गी (42 -552), बेंगलोर शहर (10 – रुग्ण 434), यादगिरी (74 -373) आणि रायचूर (आज 0 -एकूण 356) या जिल्ह्यांचा समावेश आहे

Mask corona
Mask

*जिल्ह्यात 133 ॲक्टिव्ह केसेस*
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार शुक्रवार दि. 5 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 252 झाली असून ॲक्टिव्ह केसेस 133 आहेत. आत्तापर्यंत एकूण 14,621 जणांचे निरीक्षण पूर्ण झाले असून 12,015 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अद्याप 836 नमुन्यांचे अहवाल हाती येणे बाकी आहेत.

जिल्ह्यातील 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 5,300 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 133 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 1,973 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 7,215 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 13,325 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.

त्यापैकी आत्तापर्यंत 252 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकाच रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी 126 रुग्ण कोरोना संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.