Friday, March 29, 2024

/

राज्यात नव्याने आढळले 176 रुग्ण : 7,000 झाले एकूण रुग्ण

 belgaum

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 176 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असल्यामुळे राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 13 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 7,000 इतकी चार अंकी राउंड फिगर झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बेळगाव जिल्ह्यात काल रविवार सायंकाळपासून एकही ही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 304 इतकी स्थिर असून ॲक्टिव्ह केसेस 80 आहेत.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 13 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज रविवार दि. 14 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 176 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये 6 आंतरराष्ट्रीय, तर 88 आंतरराज्य प्रवाशांचा समावेश आहे. राज्यातील 7,000 कोरोनाग्रस्तांपैकी 3,955 जणांना आत्तापर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 2,956 असून यापैकी 16 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुळे मात्र गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 86 झाले आहे.
असून यापैकी तिघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांपैकी उडपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात आणखी 21 रुग्ण आढळून आल्यामुळे सध्या राज्यात सर्वाधिक 1,026 रुग्णांसह हा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. चामराजनगरचा अंतर्भाव झाल्याने कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 झाली असून या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. उडपी (आज 21 रुग्ण – एकूण रुग्ण 1026), बेंगलोर शहर (42 – 690), यादगिरी (22 -809), बिदर (20 -370), कलबुर्गी (13 -896), धारवाड (10 -121), बेळ्ळारी (8 -187), कोलार (7 -48), कारवार (6 -114), मंड्या (5 -343), मंगळूर (5 -268), बागलकोट (4 -104), रामनगर (3 – 19), रायचूर (2 -385), शिमोगा (2 -91), बेळगाव (0 -304), हासन (1 -237), विजयपुरा (1 -229), बेंगलोर ग्रामीण (1 -38), हावेरी (1 -25), दावणगिरी (0 -226), चिकबळ्ळापूर (0-152), म्हैसूर (1 -114), गदग (0 -49), चित्रदुर्ग (0 -43), तुमकुर (0 -41), चिक्कमंगळूर (0 -19), कोप्पळ (0 -13), कोडगु (0 -3) आणि चामराजनगर (आज 0 रुग्ण- एकूण रुग्ण 1). याखेरीज इतर रुग्णांमध्ये परराज्यातील रुग्ण आणि परदेशातून आलेल्या प्रवासी रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.