Saturday, April 20, 2024

/

शेडबाळ -नरवाड मार्गावर तब्बल 1.8 कोटीची रोकड जप्त

 belgaum

कागवाड (जि.बेळगांव) तालुक्यातील शेडबाळ रेल्वे स्टेशननजीकच्या शेडबाळ – नरवाड मार्गे बेकायदेशीररित्या घेऊन जाण्यात येत असलेली तब्बल 1 कोटी 8 लाख 54 हजार रुपयांची रोकड कागवाड पोलिसांनी जप्त केली.

शेडबाळ रेल्वे स्टेशनजवळ संशयित वाहनाची तपासणी करणाऱ्या सीपीआय शंकरगौडा बसनगौडा व कागवाड पीएसआय हणमंत धरमट्टी यांना नजीकच्या शेडबाळ – नरवाड मार्गे बेकायदा पैशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तेंव्हा त्यांनी तात्काळ कारवाई करत एका संशयित वाहनाला अडवून झडती घेतली असता गाडीतील तिघाजणांकडून तब्बल 1 कोटी 8 लाख 54 हजार रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कम सापडली.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तिघेजण शहापूर, बेळगांव येथून पुणे महाराष्ट्राकडे सोने खरेदी करण्यासाठी जात होते. त्यावेळी कागवाड पोलिसांनी प्रसंगावधान राखून संबंधित तिघांकडील 1 कोटी 8 लाख 54 हजार रुपये इतकी बेकायदा रोख रक्कम हस्तगत केली. याप्रकरणी कागवाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास जारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.