Thursday, April 25, 2024

/

14 मते मिळाल्यास तिसरी जागा भाजपकडे?कोरे कत्ती करणार का लॉबिंग?

 belgaum

कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी येत्या शुक्रवार दि. 19 जून 2020 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे ईराण्णा कडाडी व अशोक गस्ती यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील प्रभाकर कोरे आणि रमेश कत्ती यांचा हिरमोड झाला आहे. मात्र तिसऱ्या जागेसाठी अतिरिक्त 14 जागा मिळवल्यास तिसरी जागा कुणाला मिळते यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यसभेच्या चार जागांसाठी ईराण्णा कडाडी व अशोक गस्ती यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली असली तरी डॉ प्रभाकर कोरे हे अद्यापही इच्छुक आहेत. राज्यसभा सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 44 मते पडणे आवश्यक असते. भाजपकडे यासाठी अतिरिक्त 28 मते आहेत. तथापि ही 28 मते आणि दोन अपक्ष मते जमेस धरली तरी कोरे यांच्यासाठी तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपला आणखी 14 मतांची गरज भासणार आहे.

या तिसऱ्या जागेसाठी कोरे किंवा कत्ती प्रयत्न करणार आहेत का? प्रयत्न केला तर अतिरिक्त मते कशी घेणार हा देखील प्रश्न आहे.

 belgaum

दरम्यान, नवी दिल्ली येथील हाय कमांड ने रमेश कत्ती आणि प्रभाकर कोरे या दोघांनाही वगळून कडाडी व गस्ती यांना कर्नाटकातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपशी अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी काँग्रेस पक्षाचे बी. के. हरिप्रसाद व राजीव गौडा, भाजपचे डॉ. प्रभाकर कोरे आणि निधर्मी जनता दलाचे कुपेंद्र रेड्डी यांचा सदस्यत्वाचा कालावधी येत्या 25 जून रोजी समाप्त होत आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या 1 जून रोजी राज्यसभेची पोटनिवडणूक शुक्रवार दि. 19 जून 2020 रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि 9 जून ही आहे. त्यानंतर 19 जून रोजी निवडणूक आणि मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.