Friday, May 3, 2024

/

गुंजी नजीक रेल्वे च्या धडकेत गवी रेड्यांचा मृत्यू

 belgaum

गुंजी तालुका खानापूर येथे रात्री नऊच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत दोन गव्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. याची माहिती वन खात्याला देण्यात आली. लोंढा विभागात अधिकारी प्रशांत गौराणी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

गुंजी परिसरात गवी रेड्यांची संख्या अधिक आहे. अन्न पाण्याच्या शोधात गवी रेडे फिरत असतात. अनेक वेळा ते रस्ता किंवा रेल्वे रूळ ओलांडत असतात. मात्र बऱ्याच वेळा रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून त्यांना आपला जीव गमवावा लागतो. वारंवार अशा घटना घडत असतात. त्यामुळे याबाबत थोडा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

Khwpur
Khanapur

वरिष्ठ अधिकारी अमरनाथ करुणाकर, प्रशांत गौराणी, गुंजी विभागाचे राजू पवार, वनकर्मचारी विनायक आदींनी पंचनामा केला. त्यानंतर गुंजी येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चरंतीमठ यांनी दोन्ही गवी रेड्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा केला आहे.

 belgaum

अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागानेही ही या परिसरातून जाताना रेल्वे सावकाश सोडावी अशी मागणी होत आहे.

View this post on Instagram

गोमांस वाहतुक करणाऱ्या चार वाहनांचा क्रमांक KA22 C 3695 GA08 V8715 KA22 D 1834 KA23 A 5615 असा आहे. गेल्या पंधरा दिवसामधे हि चौथी सर्वात मोठी कार्यवाही बजरंग दलाचा कार्यकरत्यानी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बजरंग दल कार्यकर्त्यांनी गोमांस वाहतूक करणारी वाहने ठळकवाडी येथील बिग बझार,कित्तूर चन्नमा चौक येथे अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत.काही दिवसांपूर्वी गोमांस वाहतूक करणारे वाहन थांबवून अज्ञात व्यक्तींनी ते वाहन पेटवून दिले होते.

A post shared by Belgaum live (@belgaumliveofficial) on

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.