Saturday, April 20, 2024

/

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 15,242 : बेळगाव पोहोचले 328 वर

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील दोन रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 947 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 30 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 15,242 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात आणखी 20 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 328 झाली आहे. तर कोरोना मुळे एक मृत्यू वाढला असून आता पर्यंत बेळगावात दोघांचा बळी गेला आहे पहिला बळी हिरेबागेवाडी तर दुसरा बळी अथणी येथील आहे.

राज्यात काल सायंकाळपासून सर्वाधिक रुग्ण बेंगलोर शहरात (503) आढळून आले असून येथील मृतांच्या संख्येने (95) शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सध्या राज्यात एकूण सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण देखील बेंगलोर शहरांमध्येच (4,555) आहेत. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 29 जून सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 30 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 947 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 15,242 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 7,074 असून यापैकी 271 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात मंगळवारी 235 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 7,918 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 20 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 246 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 503 रुग्ण – एकूण रुग्ण 4555), बेळ्ळारी (61-834), हावेरी (49-119), मंगळूर ( 44-741), कारवार (40-253), विजयपुरा (39-399), शिमोगा (22-173), बेंगलोर ग्रामीण (21-129), बिदर (17-607), धारवाड (17-345), हासन (16-397), कलबुर्गी (15-1436), रायचूर (15-488), चिकबळ्ळापूर (13-214), दावणगिरी (12 -309), रामनगर (12-162), चिक्कमंगळूर (10-80), उडपी (9-1206), म्हैसूर (9-268), बागलकोट (4-188), कोडगु (4-47) कोलार (3-122), चित्रदुर्ग (3-62), यादगिरी (2-828), मंड्या (2-416), बेळगाव (2-328), गदग (2-176), तुमकुर (1-94), कोप्पळ (0-84), आणि चामराजनगर (आज 0 रुग्ण- एकूण रुग्ण 33). याखेरीज इतर 36 रुग्णांमध्ये परराज्यातील रुग्ण आणि परदेशातून आलेल्या काॅरंटाईन प्रवासी रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.