Friday, April 19, 2024

/

“यांनी” केले असहाय्य व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

 belgaum

सोबत कोणीही नातेवाईक नसलेल्या व स्वतःच्या निवासस्थानी निधन पावलेल्या एका व्यक्तीवर माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टिळकवाडी महर्षी रोड येथे राहणाऱ्या 52 वर्षीय विवेक चव्हाण यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. विवेक हे घरी एकटेच राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची कोणालाही कल्पनाच आली नाही. तीन- चार दिवस त्यांच्या घरातून कसलाच आवाज आणि हालचाल नाही हे लक्षात येताच शेजाऱ्यांनी टिळकवाडी पोलिसांना याबाबत कळवले.

Creamition
Helpless person creamition

तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, संतोष दरेकर, निसार, सोमशेखर यांना ही माहिती देण्यात आली या सर्वांनी तातडीने महर्षी रोड येथे चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन माहिती घेतली. विवेक चव्हाण यांच्या निधनाबद्दल परगांवात असलेल्या त्यांच्या भावाला माहिती देण्यात आली.

 belgaum

महर्षी रोड येथे मयत विवेक चव्हाण यांच्या सोबत कोणीही नसल्याने विजय मोरे, संतोष दरेकर, निसार, सोमशेखर व राजू भातकांडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. कोरोना संदर्भातील नियम पाळून हा विधी करण्यात आला. उपरोक्त सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेची परिसरातील नागरिकांमध्ये प्रशंसा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.