Friday, April 19, 2024

/

कोरोना सोबत पुरस्थिती सांभाळण्यासाठी सज्ज रहा-

 belgaum

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी कोरोना संदर्भात उच्च अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.जिल्हा पंचायतीच्या सभागृहात जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

यापूर्वी ताब्लिकी आणि अजमेर कानेक्शनमुळे राज्यात कोरोना रुग्ण वाढले होते.त्यावेळी प्रशासन आणि आरोग्य खात्याने चांगले कार्य करून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला होता.आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.महाराष्ट्रातून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित असल्यामुळे राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे.त्यामुळे राज्यात महाराष्ट्रातून येणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खाते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगले कार्य करत आहेत.आगामी काळात मागीलवर्षी प्रमाणे पूरस्थिती उद्भवण्याची परिस्थिती असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्या खात्याने सज्ज राहावे अशी सूचनाही मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केली.

Ramesh jarkiholi
Ramesh jarkiholi

बैठकीत रेल्वे मंत्री सुरेश अंगडी,शशिकला जोल्ले आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आपली मते आणि सूचना मांडल्या.

 belgaum

बळळारी नाला स्वच्छ करा-

मागील वर्षी पुरात बळळारी नाल्यातील गाळ न काढल्याने खूप नुकसान झाले होते त्यामुळे यावर्षी बेळळारी नाला तात्काळ स्वच्छ करा गाळ काढा अश्या सूचना जारकीहोळी यांनी मनपा आयुक्तांना दिल्या. नाला अतिक्रमण रोखण्यासाठी सर्व्हे कार्य हाती घ्या असे सांगत लवकरच नाल्याची पहाणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1124442761246649&id=375504746140458

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.