Friday, April 26, 2024

/

“बीम्स”मधील रुग्णांची वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत : व्हिडिओ झाला व्हायरल

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारांचे अधिकृत इस्पितळ असणारे बेळगावचे बीम्स हॉस्पिटल दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. या हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांसंदर्भातील सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या बीम्समधील रुग्ण तेथील वैद्यकीय कर्मचारी आणि खुद्द हॉस्पिटलचे संचालक डॉ. दास्तीकोप्प यांच्याशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सदर व्हिडिओमध्ये इतरांना तीन-चार दिवसात डिस्चार्ज देता मग आम्हाला का अद्याप हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे असा जाब संबंधित रुग्ण विचारताना दिसतात. आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण आहेत? याची शहानिशा करण्याचा संबंधित रुग्णांनी प्रयत्न केला. तेंव्हा शिकाऊ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे समजल्याने ते संतप्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

Bims vdo viral
Bims vdo viral

यासंदर्भात बीम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी ज्या रुग्णांचे घशातील स्त्रावाचे अर्थात स्वॅबचे नमुने निगेटिव्ह येतात त्यांनाच आम्ही डिस्चार्ज देत आहोत. नियमानुसार मला डॉक्टरांची नांवे उघड करता येणार नाहीत. परंतु स्वॅबचे नमुने घेणारे डॉक्टर हे कान, नाक, घसा तज्ञच असतात, शिकाऊ डॉक्टर त्यांना त्यांच्या कामात फक्त मदत करतात, असे स्पष्टीकरण दिले आहे.

 belgaum

दरम्यान, बीम्स हॉस्पिटलमधील कांही रुग्णांनी आपला स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील आपल्या उपचारात काहींही बदल झालेला नाही असे सांगितले. तसेच काहींनी आठवडा झाला तरी आपल्याला आपला स्वॅब तपासणीचा अहवाल काय आला? हे कळाले नसल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात या हॉस्पिटलमधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या खराब अन्नाबद्दल आणि जेवनात झुरळ सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सदर हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहांची अवस्था ही खराब असून त्यांची स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.