आढळले नव्याने 5 रुग्ण : जिल्ह्याची संख्या झाली 264

0
 belgaum

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बेळगाव जिल्ह्यात आज शनिवार दि. 6 जून 2020 रोजी नव्याने आणखी 5 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 264 इतकी झाली असून यापैकी 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी आणखी 5 जण कोरोनाबाधित आढळून आले असून यापैकी तिघेजण महाराष्ट्र रिटर्न आणि दोघेजण गुजरात रिटर्न आहेत.

bg

आज आढळलेल्यांपैकी बीएलव्ही 259, पी – 5018 आणि बीएलव्ही 263, पी – 5022 क्रमांकाचे अनुक्रमे 40 व 23 वर्षीय पुरुष रुग्ण गुजरातहून बेळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बीएलव्ही 260, पी – 5019, बीएलव्ही 261, पी – 5020 आणि बीएलव्ही 262, पी – 5021 क्रमांकाचे अनुक्रमे 35 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी हे तीन रुग्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. या पाच रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 264 इतकी झाली असून यापैकी 126 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.