Saturday, April 20, 2024

/

येळ्ळूर डी नोटिफाय- तर सदाशिवनगर नोटीफाय

 belgaum

येळ्ळूर मधील कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आणि येळ्ळूरमध्ये निर्दिष्ट कालावधीत नवा रुग्ण आढळला नसल्यामुळे येळ्ळूरच्या कंटेन्मेंट झोनचे डी नोटिफिकेशन करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.

तोपर्यंत म्हणजे सदाशिवनगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीत कोरोना बाधित महिला आढळल्याने सदाशिवनगर भाग सील करण्यात आला असून तो कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॅम्प भागात देखील रुग्ण बरा होऊन परतला आहे.तेथेही नवीन रुग्ण आढळला नाही.पण सदाशिवनगर मध्ये रुग्ण सापडल्याने त्या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आल्या होत्या याची माहिती गोळा करण्यात येत आहे.

त्या महिलेच्या प्राथमिक संपर्कातील व्यक्तींना देखील क्वांरंटाईन करण्यात आले आहे.त्या व्यक्तीचे अहवाल काय येतात याकडे लक्ष लागले आहे.येळ्ळूर,कॅम्प,पिरनवाडी ,उज्वल नगर नंतर आता सदाशिव नगर भाग आता सील करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.