Monday, April 29, 2024

/

2 वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉजिटीव्ह-बेळगावात चार रुग्णांची वाढ

 belgaum

2 वर्षीय केरळ रिटर्न बालिका कोरोना पॉजिटीव्ह-बेळगावात चार रुग्णांची वाढ

बेळगावात मंगळवारी 13 रुग्णांची वाढ झाल्या नंतर बुधवारी देखील पॉजिटिव्ह रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली असून बुधवारी 27 मे रोजीच्या दुपारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये 4 नवीन रुग्ण वाढले आहेत.बेळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्या एकूण 147 झाली आहे त्यात 8 जण बागलकोट जिल्ह्यातील आहेत ज्यांच्यावर बेळगावात उपचार सुरू आहेत.

नवीन चार कोरोना पोजिटिव्ह रुग्णांत 2 महिला एक पुरुष तर एक दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे.दोन वर्षीय बालिका केरळ रिटर्न आहे त्याच्या शिवाय दोघे जण महाराष्ट्र तर एक जण दिल्ली रिटर्न आहेत.

 belgaum

पर राज्यातून आलेल्या आणि क्वारंटाइन झालेल्यांत पोजिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे गेल्या चार दिवसां पासून बेळगाव जिल्ह्याचा आकडा सतत वाढत आहे दोन दिवस एक ने तर काल13 ने आकडा वाढला होता आज याची वाढ 4 ने झाली आहे.

राज्यातील आकडा देखील दररोज 100 ने वाढत असून बुधवारी नवीन 122 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे कर्नाटक राज्यातील आकडा देखील 2405 इतका झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.