Saturday, July 13, 2024

/

या दोघांची अशीही माणुसकी…

 belgaum

बेळगाव शहरात सतत सामाजिक कार्यकर्त्यांत अग्रेसर असणाऱ्या जाएन्टस या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी महिलेला वेळेत इस्पितळात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

कामगार दिनानिमित्त शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप करून घरी परतत असताना टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयासमोर सांवगाव येथील रहिवासी कल्पना दीनानाथ बाणेकर वय 45 आणि त्यांचा मुलगा हे दोघे दुचाकीवरून होते त्यावेळी स्पीडब्रेकरवरून पडून अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्या अत्यवस्थ स्थितीत विव्हळत पडल्या होत्या.

त्याठिकाणी हुन जायंट्स फेडरेशन सदस्य मदन बामणे आणि संचालक सुनिल चौगुले जात होते त्यांनी लागलीच त आपल्या मारुती व्हॅनमध्ये घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले व वेळेत उपचार सुरू केला.जाएन्टस संस्थेच्या या दोन्ही सदस्यांनी अपघात झालेल्या महिलेस वेळेत इस्पितळात पाठवून माणुसकी दाखवली आहे त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.आपत्कालीन काळात अश्या घटना झाल्या तर तिथून निघून न जाता जखमींना त्वरित कसे इस्पितळाला पाठवण्याची सोय करावी असे सुनील चौगुले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.