Thursday, April 25, 2024

/

अज्ञात वाहनाच्या धडकेत पी एस आय ठार

 belgaum

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक ठार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथे घडली आहे. सौन्दत्ती पोलीस स्थानकाचे पी एस आय यल्लप्पा तलवार वय 59 असे या अपघातात मयत झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

काम संपवून ते घराकडे परतत असतेवेळी ही घटना घडली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.मागील महिन्यात बेळगाव जवळील येळ्ळूर रोड येथे देखील दुचाकी अपघातात एका पी एस आयचा मृत्यू झाला होता त्या नंतर लॉक डाऊन काळात अपघातात पोलीस मयत झाल्याची ही दुसरी घटना आहे.

सौन्दत्ती गावच्या बाहेरील रस्त्यावर हा अपघात घडला असल्याचो माहिती मिळाली आहे.मयत पी एस आय हे बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ गावचे निवासी आहेत सौन्दत्ती पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात हा अपघात झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.