Tuesday, April 23, 2024

/

बेळगुंदी येळ्ळूर पाठोपाठ पिरनवाडी कोरोनामुक्त

 belgaum

रविवारच्या जिल्हा आणि राज्याच्या आरोग्य बुलेटिन मध्ये पिरनवाडी येथील कोरोना पोजीटिव्ह रुग्ण बरा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे बेळगाव शहरा लगत असलेल्या सभोतालच्या ग्रामीण भागातील असलेले तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता बेळगाव शहरातील मधील एकमेव रुग्ण हा पोजीटिव्ह आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत(कोतवाल गल्लीतील दोघे अजमेर रिटर्न वगळता कारण ते बेळगावला आलेच नाहीत निपाणीत आहेत) उर्वरित हिरेबागेवाडी वगळता कुठेही पोजीटिव्ह रुग्ण नाही त्यामुळे बेळगाव शहर परिसरासाठी काही प्रमाणात दिलासा आहे.

राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये पी 258 या 33 वर्षीय पिरनवाडीचा युवक बरा झाला असून त्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पी 284 पी 287 हे देखील हिरेबागेवाडी रुग्ण डिस्चार्ज आहेत अशी माहिती आहे.जिल्हा बुलेटिन मध्ये एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 अशी आहे मात्र राज्य बुलेटिन ची माहिती जोडल्यास 38 जण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूणच दोन्ही आकड्यांचा तफावत आहे त्यामुळे नेमके 37 की 38 किती डिस्चार्ज आहेत हे पुन्हा एकदा आरोग्य खात्याने स्पष्ट केल्यावर समजणार आहे.

सोमवारी साठी 272 जणांचे अहवाल प्रतीक्षेत

 belgaum

बागलकोट मधील 8 अजमेर रिटर्न पोजिटिव्ह रुग्णांवर बेळगावात उपचार सुरू आहेत.एकूण 38 अजमेर रिटर्न होते त्यापैकी 8 निगेटिव्ह 22 बेळगावचे पोजीटिव्ह तर 8 बागलकोट पोजीटिव्ह असल्याची माहिती दुपारच्या बुलेटिन मध्ये देण्यात आली होती.राज्य बुलेटिन बेळगाव 113 पोजीटिव्ह सांगत आहे तर जिल्हा बुलेटिन बेळगाव 107 नमूद करत आहे.राज्य बुलेटिन मध्य बागलकोट रुग्णांचा बेळगावात उपचार सुरू आहे त्यामुळे त्यांची गणना देखील बेळगाव मध्ये करण्यात आली आहे.जिल्हा बुलेटिन मध्ये बागलकोटचे 8 वगळून 107 अशी माहिती दिली आहे.

9 मे स्थानिक मेडिकल बुलेटिन-272 अहवाल प्रतीक्षेत असून 77 ऍक्टिव्ह केस -37 डिस्चार्ज- बेळगावचे 107 पोजिटिव्ह -आता पर्यंत 6576 नमुने प्रयोगशाळेत पाठवले त्यापैकी 6121 निगेटिव्ह आले आहेत.1657 जणांनी 28 दिवसाचे तर 3173 जणांचे 14 दिवसांचे क्वांरंटाइन पूर्ण झाले आहे.एकूण 77 रुग्ण अतिदक्षते खाली आहेत. आता पर्यंत 7873 जण निरीक्षणाखालो असून 2966 14 दिवसांच्या क्वांरंटाइन मध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.