Friday, April 19, 2024

/

लग्नांमध्ये येऊ शकतात फक्त 50 पाहुणे

 belgaum

ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला आणि लहान मुलांना बंदी-लॉक डाऊन मुळे सारी परिस्थिती अवघड झाली आहे, सध्या काही नियम शिथिल केले जात असून कर्नाटक सरकारने विवाह सोहळ्या संदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे, कोणत्याही विवाह सोहळ्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना समावेश करून घेऊ नये, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील लहान मुलांना लग्नामध्ये समावेश करून घेऊ नये, स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती परवानगी घेतली जावी आणि सर्व पाहुण्यांनी आपल्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड केलेले असावे, अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत.

लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी आणि प्रवासाचे पास घेणे आवश्यक आहे .50 पेक्षा जास्त लोकांना आमंत्रण दिले जाऊ नये चांगल्या खुल्या ठिकाणी आणि व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी लग्न सोहळा आयोजित करावा. कंटेनमेंट झोन मधल्या नागरिकांना विवाह सोहळ्यासाठी बोलावू नये. प्रवेशद्वारावर हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावेत.

नागरिकांना आत मध्ये प्रवेश करताना हात धुवूनच घेतले जावे. प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग करण्यात यावी. ताप सर्दी खोकला किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्यांना लग्नसमारंभात प्रवेश देऊ नये त्यांना लागलीच वैद्यकीय उपचारांसाठी पाठवावे.
प्रत्येक व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे आवश्यक आहे. विवाह सोहळा होत असताना प्रत्येक व्यक्तीने सोशल डिस्टन्स पाळावे दोन व्यक्तींमधील अंतर एक मीटर असणे आवश्यक आहे. हात धुण्याच्या ठिकाणी साबण आणि पाणी पुरेसे असले पाहिजे.
मध्यपान पान तंबाखू गुटखा यासारखी व्यसने करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. लग्न समारंभाचे ठिकाण पूर्णपणे स्वच्छ असावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि खोकण्यावर बंदी घालावी.

 belgaum

एकंदर नियोजनासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक असावी. लग्न समारंभाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाची नावासकट यादी आणि त्याचा संपर्क क्रमांक ठेवावा तसेच प्रत्येकाने आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहेत. अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.