Friday, April 26, 2024

/

राज्यात बेळगाव दुसऱ्यावरून आता चौथ्या क्रमांकावर

 belgaum

राज्यात गेल्या चोवीस तासात मंड्या आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधित संख्येच्या क्रमवारीत काल राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेळगाव जिल्ह्याने आता चौथा क्रमांक गाठला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या क्रमवारीत काल बेळगाव जिल्हा एकूण 116 रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर होता, तर कलबुर्गी जिल्हा 114 रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र मंगळवारी एका दिवसात कलबुर्गी जिल्ह्यात नव्याने 13 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्यामुळे आता कलबुर्गी जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर बेंगलोर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मंड्या जिल्हा आहे. कलबुर्गीच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या देखील जास्त आहे.

आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आणि रुग्णांना डिस्चार्ज दिलेले राज्यातील पहिले चार क्रमांकाचे जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. बेंगलोर शहर 246 बाधित रुग्ण 114 जणांना डिस्चार्ज, मंड्या जिल्हा 160 बाधित 21 डिस्चार्ज, कलबुर्गी जिल्हा 127 बाधित 55 डिस्चार्ज आणि बेळगाव जिल्हा 116 बाधित रुग्ण आणि 64 जणांनाडिस्चार्ज.

 belgaum

(वरील बातमीतील आकडे कर्नाटक राज्य आरोग्यखात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये देण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या अनुसार बेळगावात 110 कोरोना पोजिटीव्ह आहेत. याची नोंद घ्यावी राज्य बुलेटिन मध्ये 8 जण बागळकोट रुग्णांचा देखील बेळगाव असा समावेश केला जातो त्यामुळे हे आकडे बदलत असतात)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.