Friday, September 20, 2024

/

ईद संपेपर्यंत लॉक डाऊन वाढवा-अंजुमन संस्थेची मागणी

 belgaum

जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लॉकडाऊनचा कालावधी रमजान ईदपर्यंत वाढवावा अशी मागणी अंजुमन इस्लाम संस्थेच्यावतीने जिल्हाप्रशासनाला करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील मुस्लिम धर्मियांनी रमजान साध्या पद्धतीने आणि आपल्या घरात साजरी करावी असे आवाहन बेळगाव अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांनी बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून केली आहे.

कोरोना वायरसचा राज्यात आणि देशात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. याला अटकाव करण्यासाठी सरकारने लागू केलेले नियम आणि कायदे पाळणे आवश्यक आहे. अंजुमन संस्था आणि इतर मुस्लिम संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लॉकडाऊनचा कालावधी रमजान ईद पर्यंत म्हणजेच दि 25 मे पर्यंत वाढवावा अशी मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी अंजुमन संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मुस्लिम संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Raju seth anjuman bgm
Raju seth anjuman bgm

सर्वानुमते झालेल्या चर्चेनुसार जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणे तसेच जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद अत्यंत साधेपणाने आणि आपल्या घरातच साजरा करावा याबाबत निर्णय घेण्यात आला. सतरा तारखेनंतर लॉक डाऊन उठवण्यात आल्यास लोकांचे एकमेकांत मिसळण्याचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे. याचे भान ठेवून अंजुमनच्या वतीने हा निर्णय घेण्यात आल्याचेराजू शेठ यानी सांगितले.

विशेष म्हणजे शहरातील सर्व जमातींनी ईद संपेपर्यंत लॉक डाऊन वाढवा अशी मागणी अंजुमन कडे पत्राद्वारे केली आहे त्यामुळे ईद साध्या पद्धतीनं साजरी करा व लॉक डाऊन वाढवा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केलं.

सरकारने जे काही नियम करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले आहेत ते जनतेच्या भल्यासाठीच आहेत आणि यासाठी जनतेने ही सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.नवीन कपडे घेणे गरजेचे नसून साफसफाई आवश्यक आहे. गल्ली-मोहल्यातील जमातीचे प्रमुख तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरू ईद साधेपणाने साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती आणि सूचना करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1100876103603315&id=375504746140458

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.