Friday, March 29, 2024

/

हॉट स्पॉट झोन मध्ये तीन हजार कुटुंबाना दिले औषध

 belgaum

कोरोनासाठी अर्सेनिक अल्ब 30 या औषधाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सल्ला दिला जातो. आता सर्वत्र हे औषध लोकांमध्ये वितरित केले गेले आहे.
बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने या औषधांच्या वितरणासाठी पुढाकार घेतला आहे.हे प्रतिबंधात्मक औषध सर्व सामान्य लोकांना विनामूल्य दिले जात आहे .बुधवारी माजी आमदार संजय पाटील आणि डॉ.सोनाली सरनोबत यांच्या वतीने या औषधांचे वितरण केले.

Hirebagewadi bjp
Hirebagewadi bjp

भाजपा वैद्यकीय कक्षाच्या वतीने मोफत वितरण शिबिराचे कोरोना हॉटस्पॉट हिरेबागेवाडीत मध्ये आयोजन केले होते .तीन हजार कुटुंबांना हे औषध वितरित करण्यात आले.

ग्रामीण भाजपा कार्यकर्त्यांनी याचे वितरण केले.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी औषधे, खबरदारी आणि स्वच्छतेची गरज याबद्दल माहिती दिली.

 belgaum

सर्व वितरकांना औषधांचे वाटप करताना सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला त्यांनी दिला .कार्यक्रमाला संजय पाटील,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती कलावती धारेपनावर, बीजेपी महिला मोर्चा सदस्या श्रीमती गिरिजा मठपती, एपीएमसी सदस्य फडिगौडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.