Friday, April 19, 2024

/

स्वतःवर गोळ्या झाडून डी सी बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

 belgaum

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सेवा बजावणाऱ्या पोलीस गार्डने स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
प्रकाश गुरवन्नावर (वय ३२ ) असे त्याचे नाव आहे. शहर राखीव दलात पोलीस म्हणून कार्यरत होता.जिल्हाधिकारी बंगल्यावर सेवा बजावत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश हा डी सी बंगल्यावर सेवा बजावत होता सकाळी सात वाजता त्याने स्वतःच्या अंगावर बंदुकीने गोळ्या झाडून घेतल्या ही घटना बंगल्यावर काम करणाऱ्या इतरांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची कल्पना सर्वांना दिली.

Dc bangalow
Dc bangalow gurad suicide

पोलीस आयुक्त लोकेशकुमार,पोलिस उपायुक्त सीमा लाटकर घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.प्रकाश हा मूळचा कित्तुर जवळ अंबडगडी या गावचा असून त्याच्या पश्चयात आई पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे.2008 मध्ये तो पोलीस दलात भरती झाला होता.

प्रकाश याने जबड्यात दोन गोळ्या घालून घेतल्या असून त्या डोक्यातून आर पार झाल्या आहेत.या प्रकरणी ए पी एम सी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.आत्म हत्येच नेमकं कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.