Saturday, April 20, 2024

/

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिप अप टू डेट फॅमिली. एक चांगलं फ्रेंडसर्कल, गुणी मुलं, मनमिळावू नवरा असं सगळं काही व्यवस्थित असलेली ’यशश्री’! तिला मात्र अलीकड एक नवीनच त्रास जाणवू लागला होता. सकाळी उठल्यापासून ते घरातून आवरून बाहेर पडेपर्यंत पाच ते सहा वेळा पोट झाडायचं. मग दिवसभर थकवा, चिडचीड जाणवायची झोप यायची नाही. तात्पुरते उपचार बरेच करून झाले पण काही फरक पडेना. यशश्रीचं झालं होत काय तर करियर, फॅमिली मेंटेनन्स सगळं सांभाळता सांभाळता तिच्या नाकेनऊ यायचे. सतत नंतरच्या खोळंबलेल्या कामांचा ध्यास आणि त्यामुळे स्वतःच्या मनाच्या शांतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष. असं होता होता एक दिवस ’इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ नावाच्या या विकाराने यशश्रीला पुरतं ग्रासलं होतं.

आयबीएस हा मनोशारीरिक विकारांपैकी एक मानला जातो. कारण आतड्याांमध्ये दृष्य फरकांशिवाय (म्हणजे आतड्यांचा दाह ’कोलायटीस’ शिवाय) आतड्यांचे आकुंचन प्रसरण अति प्रमाणात होते किंवा अगदी कमी होते. मोठ्या आतड्यातून मैला तयार झाल्यावर अनावश्यक पाणी पुन्हा शरीरात ओढून घेतले जाते व मैला निस्सारण होण्यासाठी पुढे ढकलला जातो. मनावरील दडपणामुळे आतड्यांच्या हालचालीवर परिणाम होतो व आयबीएसचे तीन प्रकार आढळून येऊ शकतात.

Irritable bowell syndrome
Irritable bowell syndrome

1. जुलाब होणे (लूज मोशन)
2. शौचास न होणे (कान्स्टीपेशन)
3. जुलाब व बध्दकोष्ट म्हणजे लूजमोशन व कॉन्स्टहीपेशन आलटून पालटून होणे.

हा विकार 20 ते 40 वयोगटातील स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. पोटात अधूनमधून दुखते, सकाळी पाच सहा वेळा जुलाब होतात. अशा व्यक्ती सतत दडपणाखाली, दुःखाच्या छायेत वावरणार्‍या असतात. जेवल्या खाल्ल्यावर ताबडतोब शौचाची भावना होते. एन्डोस्कोपी, सोनोग्राफी, शौच तपासणी यामध्ये कोणतेही रोगकारण सापडत नाही. फक्त लक्षणांवरून आयबीएसचे निदान करावे लागते.
उपचार- हा विकार मनोशारीरिक असल्यामुळे मानसिक पातळीवर या विकाराचे नियोजन व नियंत्रण करणे आवश्यक असते. रूग्णाला मानसिक आधाराची गरज असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णाची मनस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते.

योग आणि अध्यात्म- ऐहिक सुख हे पैशामार्फत मिळवता येते पण मानसिक सुख मिळवण्यासाठी मात्र योगाभ्यास, अध्यात्म, छंद यांची मदत घ्यावी लागतेच. शरीर व आत्मा यांचे संतुलन राखण्यासाठी श्रध्दा, निष्ठा, सातत्य व अध्यात्माचा अवलंब करावा लागतो. अध्यात्माचा अवलंब करण्यासाठी वयाची, जातीची, वेळेची कसलीच अटनसते. आपल्या पित्तप्रवृत्ती आटोक्यात ठेवण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता ही असतेच. मनोनिग्रहानेसुध्दा अनेक आजार बरे होतात. म्हणूनच कोणतेही उपचार घेताना आपण बरे होणारच असा ठाम विश्‍वास ठेऊन उपचार चालू करावेत. भक्त्तीभावनायुक्त्त ध्यानधारणा व योगासने याव्दारे शाारीरिक ऊर्जा नियंत्रित करण्यास शिकले पाहिजे.

होमिओपॅथी- यशश्रीचे उदाहरण आपण लेखाच्या सुरूवातीलाच पाहिले. तिला होमिओपॅथीक उपचारांनी चांगला गुण आला. जवळ जवळ सहा महिने यशश्री ट्रीटमेंट घेत होती. आहार सात्विक व माफक ठेऊन प्रथिनांवर जास्त भर देण्यात आला. मूग डाळीचा वापर आहारात वाढवला होता. अशा सर्वांगीण टोटलॅस्टिक उपचारांमुळे यशश्री पूर्ण बरी झाली. होमिओपॅथीमुळे आयबीएस वर उत्कृष्ट उपचार करता येतात.

जास्त कार्यरत असणारे लहान आंतडे-इरिटेबलबॉलसिंड्रोम म्हणजे काय?हा आजार कसा होतो त्यावर उपचार काय पहा बेळगावच्या प्रसिद्ध डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स फक्त बेळगाव Live वर
#डाॅसोनालीसरनोबत
#ईरिट्बलबाॅव्लसिंन्ड्रोम
#होमिओपॅथिकउपचार
9916106896
9964946918

जास्त कार्यरत असणारे लहान आंतडे-इरिटेबलबॉलसिंड्रोम म्हणजे काय?हा आजार कसा होतो त्यावर उपचार काय पहा बेळगावच्या प्रसिद्ध…

Posted by Belgaum Live on Saturday, May 23, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.