Friday, April 19, 2024

/

‘ या युवकाने जपली धर्मा पलीकडची माणुसकी…

 belgaum

कोरोनामुळे सगळीकडील इस्पितळात रक्ताचा तुटवडा पडत आहे.गराजेच्यावेळी जावुन पोचणे रक्तदात्याना शक्य होत नाही.त्यामुळे के एल ई सारख्या संस्थेने रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरून नेण्याची आणि आणण्याची सोय देखील केली आहे.अशा आणीबाणीच्या प्रसंगी काही जण मात्र स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करत आहेत.

एका गर्भवती मुस्लिम महिलेला रक्ताची आवश्यकता होती पण रक्तदाता मिळत नव्हता.अशावेळी देवदूतासारखा रक्तदाता रक्त देण्यास पुढे आला.सदाशिव नगर मधील हा तरुण हिंदू होता हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. कारण कोरोनाच्या संकटामुळे जात पात, धर्म,भाषा,वंश,रंगाच्या सगळ्या भिंती केव्हाच जमीनदोस्त झाल्या असून आता आहे ती जात केवळ माणुसकीची.

Vijay rathod
Vijay rathod donating blood

हिंदू तरुणाने पुढे येऊन मुस्लिम गर्भवती महिलेला रक्तदान करून जगात आहे तो एकच धर्म आणि तो म्हणजे मानवतेचा हे दाखवून दिले आहे. आफ्रिन शबोद्दीन मुल्ला या गर्भवती महिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल झाल्या होत्या त्यांना प्लेटलेट कमी झाल्याने रक्ताची गरज होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज पाहून सदाशिवनगर नगर येथील युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते विजय राठोड यांनी थेट खाजगी इस्पितळ गाठत कोणताही भेदभाव न बाळगता केवळ माणुसकी म्हणून केलेलं रक्तदान हे कौतुकास्पद आहे.केेवळ इस्पितळाला जाणे  असेल तर सामान्य माणूस टाळत आहे मात्र आपात्कालीन स्थितीत तिथं जाऊन रक्तदान करण्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

 belgaum

गर्भवती महिलेचा पती शबोद्दीन हा रक्त देणार होता मात्र सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे रमजानचा उपवास असल्याने तो रक्त देऊ शकत नव्हता अश्यावेळो विजय राठोड याने देवदूता सारखे जाऊन रक्तदान करत मुस्लिम महिलेला मदत केली व माणुसकीचे नाते जपले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.