Thursday, April 25, 2024

/

बेळगावात 13 तर राज्यात 100कोरोना पोजिटिव्ह वाढले

 belgaum

मंगळवारीच्या सकाळच्या मेडिकल बुलेटिन मध्ये राज्यात 100 तर बेळगावात नवीन 13 कोरोना पॉजिटीव्ह आढळले आहेत. बेळगावचा आकडा 143 वर पोहोचला आहे. 135 बेळगाव जिल्ह्यातले तर 8 बागलकोटचे आहेत ज्यांच्या वर बेळगावात उपचार सुरू आहेत.

बेळगावात आढळलेले 13 जण झारखंड रिटर्न होते ते शिरगुप्पी येथे क्वारंटाइन झाले होते.काल सोमवारी 14 जण कोरोना मुक्त झाले होते मात्र मंगळवारी आणखी 13 पोजिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.नवीन 13 रुग्णांत 6 पुरुष तर सात महिला आहेत.

सदर 13 जण झारखंड येथील समेद शिखर्जी येथील दर्शनाला जाऊन परतले होते शिरगुप्पी येथे क्वांरंटाइन झाले होते अथणी आणि कागवाड तालुक्यातील विविध गावातील असून 13 जणांना देखील बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

राज्यात देखील 100 रुग्णांची वाढ झाली आहे राज्य 2282 रुग्ण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.