Thursday, April 25, 2024

/

सिमेंट विक्रेत्यांकडून अव्वाच्या सव्वा दर

 belgaum

वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन झाल्यामुळे अनेकांना हा फटका सहन करावा लागत आहे. मात्र याचा फायदा आता सिमेंट किरकोळ विक्रेत्यांनी ही उचलण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे असा आदेश संबंधित डिलरांनी दिला नसला तरी मनमानी कारभार करत हा दर वाढविण्यात आल्याचे ग्राहकाकडून सांगण्यात येत आहे.

बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात अनेक जण घरगुती कामे करण्यात गुंतले आहेत. ही कामे उरकून लॉक डाऊन संपल्या नंतर नित्यनेमाने कामाला जाणे हा विचार आणून अनेक जण आपली कामे उरकून घेण्याच्या घाईगडबडीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील सीमेंट विक्रेत्यांनी अव्वाच्यासव्वा दर लावून अनेकांची लुबाडणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या सिमेंट दर 260 रुपये असून तो प्रत्येक कंपनीच्या सिमेंटाला 12 किंवा दहा रुपये फरक असू शकतो. किंवा कमी असू शकतो. मात्र ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी 380 ते 400 रुपये दर लावून अक्षराच्या 140 ते 160 रुपये नफा मिळवण्यात आपली धन्यता मानली आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसू लागला आहे. याला कोरोनाचा कारणीभुत असल्याचे सांगून ही आर्थिक लुबाडणूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 belgaum

किराणा दुकानदा असो किंवा इतर दुकानदारही ग्राहकांची लूट करण्याकडे अधिक कल वाढविला आहे. महत्त्वाचे म्हणजे साहित्य मिळत नाही आम्ही तरी काय करू, तर या दराने डीलरच विक्री करत आहेत, असे सांगून अनेकांची फसवणूक व आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. आता सिमेंट विक्रेत्यांनीही असेच प्रकार सुरू केल्याने किरकोळ काम करणारे मात्र आर्थिक अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. अशा किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

1 COMMENT

  1. Kahitari nirnay ghyayala lava Saheb hya dukandarancha. lootmarine Garib janata bhikela lagali ahe sarakar kay hya Gostikad dyan nahi det ashi loot divasen divas vadhat chalali ahe. Garib lokanch Kunala kay padalel nahi hya mothya lokana .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.