Saturday, April 20, 2024

/

तालुक्यातील पूर्व भागात पावसाने झोडपले

 belgaum

तालुक्यातील पूर्व भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले आहे. या पावसामुळे परिसरात उष्मा कमी झाला असला तरी शेतातील कामे मात्र रखडल्याचे दिसून येत आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मागील चार ते पाच दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात उष्म्यात वाढ झाली होती. घरी बसल्या नंतर हे घामाच्या धारा सुरु होत्या. अशा परिस्थितीत नागरीकाना गारव्याची आवश्यकता होती. याचबरोबर शेतीकामात अनेक जण गुंतले असताना देखील याची जाणीव होत होती. मात्र सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात उष्म्यात घट झाली असला तरी अजूनही पावसाची गरज आहे. मात्र शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्यातील पूर्व भागात काही शेतामध्ये अजूनही भाजीपाला व इतर पिके आहेत. मात्र सध्या बंद असलेल्या भाजी मार्केट मुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. बेळगाव शहराच्या चारही बाजूला भाजी मार्केट सुरू करण्यात आले असले तरी तेथे योग्य ती व्यवस्था नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत पावसाने हजेरी लावल्यामुळे भाजीपाला शेतातच कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही प्रमाणात आणखी थोडे दिवस पाऊस जावा अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

रब्बी पिकातील बटाटे काढण्याचे काम सध्या पूर्व भागात जोरदार सुरू होते. मात्र पडलेल्या पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याचेही शेतकरी सांगत आहेत. रविवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे काही ठिकाणचे पत्रे उडून गेल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक जण भयभीत झाले आहेत. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे काही ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.