Friday, April 19, 2024

/

मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

 belgaum

लाॅक डाऊनमुळे शेतकऱ्यांवर संकटावर संकटे कोसळत आहेत. यात भर म्हणून आज गुरुवारी मिरचीचा दर प्रचंड घसरल्याने मोठा आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर अक्षरशः रडण्याची वेळ आल्याचे दृश्य बेळगावच्या होलसेल भाजी मार्केटमध्ये पहावयास मिळाले.

मिरचीने आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडविले. सध्या शहरात तीन ठिकाणी होलसेल भाजी मार्केट सुरू आहे ऑटोनगर, इंडाल कॉलनी आणि बी. एस. येडियुरप्पा मार्ग या ठिकाणी सुरू असलेल्या या भाजी मार्केट मध्ये गुरुवारी मिरचीचा भाव अचानक घसरला. मिरचीचा दर अचानक कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या भरून मार्केटमध्ये मिरची आणलेल्या शेतकऱ्यांच्या चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशेवर पाणी फिरले. दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने काही शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आल्याचे दृश्य भाजी मार्केटमध्ये पहावयास मिळाले.

Mirchi chilly
File pic :Mirchi chilly belgaum veg market

शहरातील होलसेल भाजी मार्केटमध्ये गुरुवारी 60 किलोच्या मिरचीच्या पिशवीला 100 रुपये इतका दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपये किलो इतका भाव देखील मिळाला नाही. या पद्धतीने मिरचीचा भाव मोठ्या प्रमाणात गडगडल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी बैलहोंगल नजीकच्या गादी को गावातील एका शेतकऱ्यांनी आपल्या 8 एकर मिरचीच्या पिकावर रोटर मारून टाकला, तर आणि एका शेतकऱ्याने आपले 15 एकर मिरचीचे पीक रोटर मारून भुईसपाट केले आहे.

सध्या लॉक डाऊनमुळे कृषी उत्पादने बेळगाव बाहेर परगावी जाऊ शकत नाहीत. बेळगावची मिरची आसपासच्या जिल्ह्यांसह मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी जात असते. मात्र सध्या लोक डाऊन असल्यामुळे बेळगाव बाजारपेठेत मिरची मोठ्या प्रमाणात पडून रहात असून याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. केवळ मिरचीच नाही तर इतर भाजीपाल्याचा दर देखील कोसळला आहे. त्यामुळे कवडीमोल दराने भाजी विकली जात आहे. सध्या 70 किलो वांग्याच्या पिशवीला 100 रुपये तर 25 किलो टोमॅटोला 50 रुपये दर मिळत आहे. दरम्यान मागील वर्षी याच काळात मिरचीला प्रति किलो 50 रुपये इतका दर मिळाला होता त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक घेतले होते. तथापि आता लॉक डाऊनमुळे मिरचीचा दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांना फार मोठा फटका बसला आहे. ही सर्व माहिती होलसेल भाजी व्यापारी संगनगौडा पाटील यांनी “बेळगाव लाईव्ह”ला दिली. संगनगौडा पाटील यांचे बेळगाव व्हेजिटेबल मार्केट येथे भाजीपाल्याचे दुकान असून सध्या ते एपीएमसी येथे भाजीपाल्याचा व्यापार करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.