संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना सामाजिक भान ठेवत काही संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. बेळगाव येथेही अनेक संस्थाने या कामी हातभार लावला आहे. आता बेळगाव येथील राजस्थानी मारवाडी समाज शहापूर व बेळगाव यांनीही या कामात हातभार लावला आहे.
लॉक डाऊन मुळे अनेक कामगार घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राजस्थानी मारवाडी समाजाने पुढाकार घेऊन कामगार आयुक्तांकडे सुमारे पाचशे (किट) संसारोपयोगी साहित्य दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजाला मोठा हातभार लागल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
राजस्थानी मारवाडी समाजाने दिलेले साहित्य रुक्मिणीनगर मंडोळी रोड खासबाग वडगांव आदी ठिकाणी वितरित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानी मारवाडी समाजाने सामाजिक भान ठेवत हे साहित्य वितरण केल्याने अनेकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव आणि शहापूर मधील सर्व राजस्थानी युवक मंडळांनी मिळून हा उपक्रम राबवला आहे.