Thursday, April 25, 2024

/

कंग्राळीत युवकाचा खून

 belgaum

मित्रां सोबत झालेल्या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे.शंकर  गजानन पालकर वय 32 रामदेव गल्लीअसे खून झालेल्या युवकाचे नाव असून कंग्राळी खुर्द येथे शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मित्र पार्टी करायला गेले होते पार्टी करताना दारूच्या नशेत मित्रात भांडण झाले भांडणातून मयत गजानन याच्यावर चाकूने भोसकण्यात आले या घटनेत तो गंभीर जखमी झाला लागलीच इतर मित्रांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र रविवारी उपचार सुरू असताना त्याचा अंत झाला.

या खून प्रकरणी ए पी एम सी पोलिसांनी महेश जांभळेकर वय 27 रा. तिसरा क्रॉस रामनगर यास अटक केली आहे.ए पी एम सी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.