Friday, April 19, 2024

/

पाषाणहृदयी बेळगावचे रहदारी पोलीस

 belgaum

कोरोनाचं संकट आल्यानंतर सगळं जग संवेदनशील झाले असताना, बेळगाव उत्तरचे रहदारी पोलीस मात्र मुजोरी पणात मग्न झाले आहेत. महालिंगपुरची एक महिला उपचारार्थ किल्ला तलावाजवळील एका रुग्णालयात आलेली होती. उपचारानंतर डिस्चार्ज घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना नाहक त्रास देत तब्बल चार तास रखडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की सोमवारी सायंकाळी महालिंगपुरच्या ईरटीका कारला रहदारी पोलिसांनी नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केली म्हणून पकडले, व गाडीला लॉक घातला व नंतरआर टी ओ सर्कल जवळ घेऊन गेले.सदर कार चालकाने दंड देण्याचे कबूल केले, तरी आपल्या खाकीचा तोरा दाखवण्यात वाहतूक पोलिसांनी कोणतीही कसर सोडली नाही.

आजारी महिला थकून रस्त्याच्या कडेला झोपली, तरीही पोलिसांकडून चालढकल करत वेळकाढूपणा करत रुग्णाची ससेलपाट केली.सदर बाब वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी माणुसकी हरवलेल्या ए एस आय ला धारेवर धरले व पोलिस निरीक्षकांला देखील दूरध्वनीवरून झाला प्रकार सांगितला, मात्र दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना कीव आली नाही.शेवटी जमलेल्या पन्नास एक कार्यकर्त्यांनी जोरदार जाब विचारला व त्या रुग्ण महिलेच्या कारची पोलिसांच्या तावडीतून सुटका करवून घेतली.दंड भरायला तयार असताना जाणून बुजून वेळ काढू पणा करणाऱ्या पोलिसांना धारेवर धरले.

 belgaum

माणुसकी हरवलेल्या त्या वाहतूक साहाय्यक उपनिरीक्षक व रहदारी पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करावी  त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी त्या वकिलांनी बेळगाव live कडे बोलताना केली.उर्मट बनलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा दबाव राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.