belgaum

नाकाच्या आजूबाजूला हवेचा दाब कमीजास्त करण्यासाठी काही पोकळ्या असतात. त्यामुळे कवटीच्या हाडाचे वजन कमी रहाते व बोलताना हवेच्या झोतावर दाब कमी जास्त करता येतो. सातत्याने सर्दी होत असल्यास तयार होणारा शेम सहजपणे या पोकळ्यांमध्ये साठतो व संसर्गाला सुरवात होते.
जुनाट म्हणजे क्रॉनिक आणि अक्यूट म्हणजे तीव्र असे दोन प्रकार सायनोसायटीस मधे करता येतात. सायनसीस चार प्रकारचे असतात.
1. मॅक्झीलरी- गालावर डोळ्याखाली
2. फ्राँटल- डोळ्यांवर भुवईकडे
3. स्फिनॉईड- डोळ्यांच्या मागे
4. इथमॉयडल- नाकाखाली
लक्षणे- डोकं, चेहरा दुखणे, सतत ठणका असणे हे सायनोसायटीसचे प्रमुख लक्षण आहे. ज्या सायनस मधे इन्फेक्शन आहे त्या मधे ठणका असतो. डोकं, मान झुकल्यावर खूप दुखतं. नाकात हिरवट पिवळा शेम असतो. क्वचित पू आणि रक्तसुध्दा आढळते. नाकाने श्वास आत ओढता येत नाही. प्रत्येक श्वास जड वाटतो. गरगरणे, डोकं हलल्या सारखं वाटणे, कानात आवाज येणे, हिरड्या सुजणे, डोळे दुखणे, कानात ठणका असणे, प्रचंड डोकं दुखणे, मळमळणे म्हणजे सायनोसायटीस. रूग्णाला फ्रेश वाटत नाही. सतत अंगात कणकण, ताप वाटत रहातो. चिडचीड, डोळ्यांचे विकार वाढतात. डोळ्याकडे कानाकडे इन्फेक्शन जाऊन डोळ्यामध्ये इन्फेक्शन वाढणे डोळे तिरळे होणे, डोळ्यात, कानात पू भरणे असे विकार होऊ शकतात. क्वचित मेंदूकडे इन्फेक्शन जाऊन मेनिंजायटीस, फीटस् कवडीचे हाड कुजणे असेही प्रकार होऊ शकतात. एक्स- रे, सीटी स्कॅनव्दारे निदान पक्के होऊ शकते.
कारणे- नाक, कान यांच्या ठेवणीमध्ये काही साधारण दोष असल्यास सायनोसायटीसची सुरवात होऊ शकते. प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे सारखी सर्दी होत असल्यास सायनोसायटीसची सुरवात होते. दातांच्या हिरड्यांच्या इन्फेक्शनमुळेही सायनोसायटीस होऊ शकतो.
उपचार- मॉडर्न उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स व अँटीइन्फ्लेमेटरी कोर्स मुळे बरे वाटते पण वारंवार होणार्‍या सायनोसायटीस वर होमिओपॅथी लागू पडते. पाहूया काही औषधांची माहिती.
1. काली बायक्रोमिकम- घट्ट चिकट दोर्‍यासारखा कफ, पिवळट हिरवट रंगाचे क्रस्ट नाकात तयार होतात. नाक चोंदणे, डोकेदुखी.
2. एरम ट्रीफ- एकच नाकपुडी ब्लॉक होते. अंगात सारखी कणकण. सततची डोकेदुखी अंगदुखी.
3. ट्युक्रीयम- क्रॉनिक सायनोसायटीस. कानात, डोळ्याकडे जाणारे इन्फेक्शन, गालावर सुज येणे इ.
इतर- पाण्यामध्ये मीठ व सोडा घालून जलनेती करणे सायनोसायटीस मध्ये फायद्याचे ठरते. गरम पाण्याची वाफ घेतल्याने सायनसीस मोकळे होतात. नियमित अनुलोम- विलोम करण्याने देखील श्वायनियंत्रण होऊन सायनसचे आजार कमी होतो.

डॉ सोनाली सरनोबत बेळगाव

bg

मोबाईल:9916106896
9964946918

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.