Friday, April 26, 2024

/

जीवनावश्यक वस्तु वेगवेगळ्या ठिकाणी मिळतील अशी सोय करा-शेट्टर

 belgaum

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू जनतेला मिळतील अशी व्यवस्था करा असा आदेश बेळगावचे पालक मंत्री जगदीश शेट्टर यांनी कोरोना नियंत्रण आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना बजावला.

शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी,अधिकारी यांची कोरोना आढावा घेण्यासाठी जगदीश शेट्टर यांनी बैठक घेतली.जीवनावश्यक वस्तूंची विक्री व्यवस्था सुरळीत केली तर लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही.केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लोकप्रतिनिधींनी जनतेत जागृती करण्याचे कार्य करावे.

बेळगावात कोरोना विषाणू तपासणीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल.या संबंधी वैद्यकीय शिक्षण मंत्री सुधाकर यांच्याशी बोलणे झाले आहे.21 दिवसाचा लॉक डाऊन पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रत्येकाने ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.ही जबाबदारी सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडली तरच कोरोनाचा नायनाट होईल असे शेट्टर म्हणाले.

 belgaum

जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी लवकरात लवकर जिल्ह्यात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी केली.
बैठकीत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी,राज्यसभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे,मंत्री शशिकला जोल्ले आणि लोकप्रतिनिधींनी आपली मते मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.