Wednesday, April 24, 2024

/

“त्या” चोरट्याकडून एकूण 12 मोटरसायकली जप्त

 belgaum

मोटारसायकल चोरी प्रकरणी अटक केलेल्या तिकडी तालुका बैल अँगल येथील तरुणाकडून आणखी सहा मोटारसायकली बागेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे जप्त केलेल्या चोरीच्या मोटारसायकलींची संख्या 12 झाली आहे.

हिरेबागेवाडी पोलिसांच्या गुड मॉर्निंग पथकाने गेल्या 4 मार्च रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हिरे बागेवाडीनजिक आझाद मेहबूबानी किल्लेदार (वय 26, रा. तिगडी) याला अटक करून त्याच्याकडील चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या होत्या. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नागराज अंबिगर यांच्या नेतृत्वाखाली यल्लप्पा हतरवाट एस. एस. भावी, एस. बी. पदकीमठ, आर. एस. कळगीमनी आदींनी सदर कारवाई केली होती. त्यानंतर गुरुवारी आझाद किल्लेदार त्याला पोलीस कोठडीत घेऊन चौकशी केली असता त्याने आणखी 6 मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजवाब वरून पोलीसांनी दोन दिवसात एकुण 12 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या चोरीच्या मोटर सायकलची किंमत सुमारे 4 लाख 45 हजार रुपये इतकी होते. बेळगावचे पोलीस आयुक्त लोकेशकुमार आणि पोलिस उपायुक्त सीमा लाटकर व यशोदा वंटगोडी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.