Sunday, April 28, 2024

/

तोटदाचार्य स्वामीजीना सुरक्षा पुरवा-यांनी केली मागणी

 belgaum

मुंडरगीचे जगदगुरू तोटदाचार्य मठाचे श्री निजगून प्रभू तोटदाचार्य यांना जीवे मारण्याची धमकीच्या आलेल्या पत्राची सखोल चौकशी करा अशी मागणी बेळगाव जिल्हा बसव अभिमानी संघाने केलो आहे.

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्या मार्फत निवेदन देत त्यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याकडे मागणी केली आहे.निजगून महास्वामी यांना एक निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे पोलिसांनी या पत्राची सखोल चौकशी करून महास्वामी यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

निजगुण महा स्वामी यांचे बसवेश्वर यांच्या विचारावर आधारित वैचारिक उपन्यास राज्यभरात प्रसिद्ध आहेत अधर्म आणि अंधश्रद्धा विरोधात त्यांनी जनतेला मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या जीविताला धोका संभव आहे त्यामुळे त्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे

 belgaum

निवेदनाची प्रत गृह मंत्री बसवराज बोम्मइ यांना देखील देण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.