Friday, April 26, 2024

/

सिलेंडर चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ

 belgaum

मच्छे परिसरात असलेल्या गॅस सिलेंडर गोदामात चोरीचा प्रकार घडला आहे. या मुळे याची तक्रार देण्यासाठी पोलिस स्थानकात गेले असता ही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रार नोंद करून चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे.

शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. गुरुवारी मध्यरात्री चोरी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्याने गोदामातील 15 सिलेंडर लांबविल्याचे उघडकीस आली आहे. याच बरोबर इतर काही साहित्यही लांबविण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचे माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आली असली तरी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

मच्छे परिसरात असणाऱ्या गोदामात या चोरीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून यापुढे इतर भागावर ही पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मालकांनी बदाम घडल्यास चोरीचा प्रकार निदर्शनास आला आहे.

 belgaum

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची माहिती देण्यात आली आहे मात्र याबाबत तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे तक्रार नोंदवून घेऊन चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.