Wednesday, April 24, 2024

/

हेस्कॉमने डिपॉझिटची रक्कम कमी करावी

 belgaum

घरगुती वीज जोडणी अर्थात इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी हेस्कॉमकडून अव्वाच्यासव्वा डिपॉझिटची रक्कम मागितली जात असून यावर त्वरित निर्बंध घालून डिपॉझिट रकमेचा आकडा परवडण्या इतका करावा, अशी मागणी अन्नपूर्णावाडी अझमनगर येथील टिपु सुलतान संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

टिपू सुलतान संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अरिफ कटगेरी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्या हेस्काॅमडून नव्या घरगुती वीज जोडणीसाठी अर्थात इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी 60 हजार रुपये इतकी अनामत (डिपॉझिट) रक्कम मागितली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 60 हजार रुपयांची ही रक्कम परवडणारी नाही. सामान्य नागरिक हयातभर राबून बचत केलेल्या पैशातून कशीबशी आपल्या घराची उभारणी करतो. घराच्या उभारणीतच त्याचा जवळील सर्व पैसा खर्च झालेला असतो. अशा परिस्थितीत हेस्काॅमकडून नव्या इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी तब्बल 60 हजार रुपये इतके डिपॉझिट मागितली जात असल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नव्या इलेक्ट्रिक कनेक्शनसाठीची डिपॉझिटची ही रक्कम अवाच्यासव्वा असून सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हेस्काॅमला डिपॉझिटचा आकडा कमी करण्याची सक्त सूचना करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

अरिफ कटगेरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये अफजल पठाण, वासिम बेपारी, रमिज गोरी, जुनेद पिरजादे, असिफ पट्टिवाले, जफर सईद, शाहिद नाईकवाडी, शैहरखान पठाण, अरिफखान पठाण आदींचा समावेश होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.