Friday, April 19, 2024

/

शेतकरी पुन्हा संतप्त बुडा समोर धरणे

 belgaum

बेळगाव जवळील कणबर्गी येथील शेतकरी पुन्हा संतप्त झाले असून त्यांनी जमीन संपादनास विरोध करत शनिवारी बुडा कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केलं.

कणबर्गी येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन विविध प्रकल्प व वसाहती निर्माण करायला संपादित होत असताना उरलेली सुरलेली जमीन देखील बुडा संपादित करू पाहत आहे यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे या जमिनीचा नाद बुडाने सोडावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

शनिवारी झालेल्या बुडा बैठकी दरम्यान बुडा आयुक्त प्रीतम नसलासपुरे यांच्याकडे समस्या मांडण्यात आल्या. बुडाने 160 एकर जमिनी पैकी अर्धी जमीन शेतकरी अर्धी बुडा देण्याचे ठरवले होते मात्र याची अंमलबजावणी झाली नाही विविध प्रकल्प राबवण्यासाठी बुडाने जमिनी लाटल्या आहेत 160 एकर पैकी 80 एकर जमीन भुमाफियांनी बेकायदेशीर रित्या लाटली आहे याचा शेतकऱ्यांना तोटा झाला आहे.

 belgaum
Farmers protest
Farmers protest

या भागातील 1200 एकर जमीन के आय डी बी बुडाने लाटली आहे तर गरिबांना 14 एकर जागेत 200 घरे बांधली आहेत. या जमिनीत शेतकरी बेळगावचे प्रसिद्ध बासमती भात आणि भाजीपाला पीक घेत असतात मात्र सरकार अनेक योजना राबवून जमिनी गिळंकृत करत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी लावला.

तीन महिन्यांपूर्वी या भूमीसंपादन विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केली होती मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.