Wednesday, May 1, 2024

/

‘कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ’…

 belgaum

गेली 63 वर्षे मराठीचा लढा निष्ठेने लढणाऱ्या मराठी माणसाला सत्तेच्या साठमारीत भाजपने कोंडीत पकडले आहे. सत्तेचे गाजर दाखवून काठावर असणाऱ्या मराठी युवकांना आपल्या जाळ्यात ओढवून मराठीं माणसाच्या विरुद्धच उभे करायचे कट कारस्थान भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी मराठी माणसाचा मानबिंदू असणाऱ्या मराठा मंदिर येथूनच रचले आहे.

एकनिष्ठेने लढणारा मराठी माणूस सुप्रीम कोर्टात मराठी माणसाला मिळणारी यशाची नांदी आणि मराठी माणसाचा एक संघपणा ही भाजपची पोट दुःखी आहे.मराठी माणसाचा पायाच उखडुने भाजपला गरजेचे वाटत आहे आणि त्याला मराठी माणूस देखील बळी पडत आहे हे दुर्दैव…

समितीचा भगवा एकीकरणचा युवक आणि समितीची मनपाची सत्ता याची भाजपला लालूच वाटत आहे सुंदर बेळगाव मराठी माणसाच्या हातातून काढून घेण्याचे भाजपचे घाटत आहे.आता मराठी युवकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे.गेली अनेक वर्षे मनपाची सत्ता मराठी माणसाच्या हातात आहे दिल्लीचे राजकारण वेगळे आणि बेळगावचे राजकारण वेगळे राष्ट्रीय मुद्दा आला की बेळगावची जनता पक्षीय मुद्द्याला समर्थन देत असते पण स्थानिक पातळीवर मराठीचा मुद्दा त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे.

 belgaum
Election ccb party symbol
Election ccb party symbol

बेळगाव मनपात पक्षीय राजकारण आता पर्यंत यशस्वी झालेले नाही फक्त भाषेच्या मुद्द्यांवर बेळगाव मनपाचे राजकारण चालत आलेले आहे त्यात भाजपने चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत एक प्रकारे मागील सभागृहात भाजपपेक्षा संख्येने अधिक असलेल्या काँग्रेसला देखील आवाहन दिले आहे.

मनपा वरील भगवा ध्वज हटवणे मराठी महापौर काळ्या दिनात सहभागी झाला म्हणून मनपा बरखास्त करणे हे देखील काम भाजपच्या राजवटीत झाले आहे.भाजप काँग्रेस आणि मराठी अशी लढत झाल्यास याचा फायदा कुणाला होऊ शकतो हे जग जाहीर आहे.शहराचे दोन्ही आमदार आपले आहेत सगळी नगरसेवक पद तुम्हाला मिळतील हा भ्रम निरास आहे . दुभंगलेल्या मराठी मनाचा फायदा घेत मागील विधान सभेत दोन आमदार निवडून आले मात्र सामान्य माणसासाठी त्या आमदारांचे योगदान या मनपात मापले जाऊ शकते यामुळे मनपा काबीज हे भाजपला पडलेले दिवा स्वप्न असू शकते.

मनपाचे किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार कै संभाजीराव पाटील यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे त्याची जागा घेण्यासाठी समितीचे खंदे नेतृत्व पुढे येण्याची गरज आहे.पाटील यांनी सातत्याने मनपावर मराठी माणसाची सत्ता कशी राहील याची काळजी घेतली होती.

जे मराठी युवक समितीची साथ सोडून राष्ट्रीय पक्षाकडे वळले त्यांनी या 63 वर्षाच्या संघर्षाचा इतिहास आठवला पाहिजे मराठी विरुद्ध मराठी लढवण्याची राष्ट्रीय पक्षांची खेळी ओळखली पाहिजे.मराठी माणसाने मराठी माणसाचा घात केला नाहीं पाहिजे.छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या
मराठी युवकांनी मराठीशी गद्दारी करत ‘कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ’ ठरू नये हिच अपेक्षा….

गुणवंत पाटील -बेळगाव

 belgaum

1 COMMENT

  1. महानगरपालिका निवडणुकीत मराठा समाज ने एकजूट होऊन लढले पाहिजे .राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पुर्ण पाठिंबा द्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.