मकर संक्रांती उत्साहात

0
 belgaum

दु : ख असावे तिळासारखे आनंद असावा गुळा सारखा जीवन असावे तिळगुळासारखे ….अशी भावना मनोमनी बाळगत शहर परिसरात मकर संक्रांत उत्साहाने साजरी झाली. या निमित्ताने सोशल मीडीयाच्या माध्यमातून अनेक संदेशांची, संक्रांतीला केंद्रियभूत ठेवून चारोळ्या आणि कवितांची देवाण घेवाण झाली. तरीही शेवटी माणसाचे परस्पराला थेट भेटणे हेच महत्वाचे ठरते. याची प्रचितीही या सणाने दिली.

सकाळपासून तिळगुळ देण्यास प्रारंभ झाला. वास्तविक सकाळी गुळपोळीचा आस्वाद घेऊन दुपारी वामकुक्षी घेऊन, संध्याकाळी तिळगुळ देण्यासाठी बाहेर पडायचे हा रिवाज. मात्र एपीएमसी निवडणुकीचा निकाल आणि काही कार्यालयांना नसलेली सुट्टी यामुळे सकाळपासूनच तिळगुळाची देवाण – घेवाण सुरु झाली.

bg

सायंकाळी तिळगुळ देण्यासाठी बाहेर पडलेल्या गर्दीमुळे बाजारपेठेत वर्दळ वाढली. तिळगुळ खरेदी करण्यासाठी सकाळी गर्दी झाली. त्यातही आपल्याला आवडेल आणि शाळेमध्ये तिळगुळ वाटताना उठून दिसेल, असा डबा शोधण्यात बालचमु गर्क होते . संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. याच दरम्यान महिलावर्ग हळदी – कुंकू करतो. त्यामुळे वाण म्हणून देता येण्याजोग्या अनेक लहान मोठ्या वस्तु बाजारात आल्या आहेत.

सोशल मीडीयावरुन संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याची अहमहमिका लागली होती . रेवडी, तिळगुळ, हलगा, तिळाचे लाडू यांचे छायाचित्रे पाठवून देत संक्रांतीच्या सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . अर्थात परस्परांना भेटून तिळगुळ वाटप करण्यातला आनंदच अनेकांनी घेतला . ज्या ठिकाणी कार्यालये सुरु होती तेथे सकाळपासूनच तिळगुळाचे वाटप सुरु झाले होते . चौकट करणे वास्तविक काळारंग हा तसा दुय्यम मानला जातो . एरवी काळे वस्त्र सहसा खरेदी केले जात नाही . मात्र संक्रांतीला आवर्जुन काळा कपडा परिधान केला जातो . काळा कपडा उष्णतावर्धक मानला जातो . थंडीच्या दिवसात काळे वस्त्र शरीरात उब निर्माण करते . हा त्या मागचा हेतू आहे . त्यामुळे महिला वर्गाने संव झांतीदिवशी आवर्जुन काळा पोषाख परिधान केला होता . काळ्या रंगाच्या पोषाखाची व साड्यांची खरेदी होणार हे लक्षात घेऊन दुकानदारांनीही शोरुममध्ये याच रंगाच्या वस्त्रांचे प्रदर्शन मांडले होते .

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.