Thursday, April 25, 2024

/

चाकुहल्ल्यात आलारवाड येथील युवक जखमी

 belgaum

बुधवारी रात्री भरतेश कॉलेज जवळ झालेल्या घटनेत एकावर चाकू हल्ला झाला आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अभिषेक महावीर कडबी ( अलारवाड) असे चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अमित बाहुबली पंचोदे ( रा.हलगा), सिध्दार्थ कल्लाप्पा जंगवाड ( अलारवाड) यांच्यावरही हल्ला करण्यात आला आहे.बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.

गुरुवारी रोहित फकिरा पुजारी (गांधीनगर) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. याबरोबरच ताशिलदार गल्ली, खासबाग, समर्थनगर व महाव्दार रोड परिसरातील पाच अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार जखमी अभिषेक व एका अल्पवयीन मुलाची कॉलेजमध्ये मैत्री होती. याच मैत्रीतून बुधवारी आमोरासमोर आल्यावर दोघे बोलले. त्यानंतर भांडण होवून अभिषेकने अल्पवयीन मुलाला एक लगावले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रांना बोलावून अभिषेकवर चाकु व रॉडने हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दोघा जणांवरही हल्ला करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.