कर्नाटकातील विविध मठाधिश आणि आंदोलकांकडून म्हादाई प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . गदग येथील तोंटद मठाधीश सिद्धाराम स्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे .
लवकरात लवकर कळसा-भांडुरा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा .अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. कळसा-भांडुरा प्रोजेक्ट पूर्ण होण्यास अडथळे येत आहेत. उत्तर कर्नाटकातील तेरा तालुक्यांना पाण्याची समस्या जाणवत आहे. म्हादाई ट्रिब्युनल ने योग्य न्याय दिला नाही. केंद्राने अद्याप नोटीफिकेशन काढले नाही .
सर्वोच्च न्यायालयात वाद गेला असला तरी न्याय मिळत नाही .अशावेळी सीमाभागात समस्या निर्माण होत असून केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निडसोशी मठचे पंचम शिवलिंगेश्वर स्वामी, हुक्केरी हिरेमठ चे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, कारंजी मठाचे गुरूसिद्ध स्वामी आणि शेकडो आंदोलक या बैठकीत उपस्थित होते.