Thursday, April 25, 2024

/

किल्ला खंदकात जवळ मानवी पाय आढळल्याने खळबळ

 belgaum

बेळगाव शहरातील किल्ला परिसरात असलेल्या जुन्या भाजी मार्केटच्या मागील भागात दोन मानवी पाय सापडल्याने खळबळ माजली आहे.

शनिवारी दुपारी किल्ला खंदका जवळ गेलेल्या रिक्षा चालकांना मानवी शरीराचे पाय दिसले.लगेच या रिक्षा चालकांनी मार्केट पोलिसांना या बाबतची माहिती दिली .लगेच मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

किल्ला खंदकात सापडलेले पाय हे पुरुषाचे आहेत की स्त्रीचे याबाबत स्पष्टता झाली नाही.पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून अवयव फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले आहेत हे रिपोर्ट आल्या नंतर हे अवयव महिलेचे आहेत पुरुषाचे याबाबत खुलासा होणार आहे.

 belgaum

अंदाजे 8 दिवसा पूर्वी कुणीतरी अन्यत्र ठिकाणी खून करून सदर अवयव किल्ला परिसरात टाकले असावेत असा संशय आहे मात्र पोलीस तपासा नंतरच सगळं स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.