Thursday, April 25, 2024

/

भरभक्कम अर्थसहाय्य मिळाल्यास उंचावणार भुतरामहट्टी निसर्गधामाचा दर्जा

 belgaum

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधामामध्ये सिंह, वाघ, अस्वल, बिबटे, चित्ते, कोल्हे आदी जंगली प्राणी आणि पक्षी ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे या निसर्गधामाचा दर्जा वाढविण्यासंदर्भात व्यवस्थापनाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. मात्र त्यासाठी मोठ्या आर्थिक सहाय्याची गरज असून हिंस्त्र जंगली प्राणी सांभाळणे त्यांची काळजी घेणे यासाठी बराच खर्च येणार असल्याने दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्गधामचे छोट्या अभयारण्यात रूपांतर झालेतर बेळगावच्या समस्त क्षेत्रांना विशेष करून पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. याबरोबरच सरकारच्या महसुलातही विविधांगाने मोठी वाढ होणार आहे.

भूतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्गधाम हे सध्या केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषानुसार ‘मिनी झू’ अर्थात कनिष्ठ प्राणिसंग्रहालय विभागात मोडते. तथापि आता या निसर्गधामाचा दर्जा उंचावण्याचा विडा व्यवस्थापन मंडळाने उचलला आहे. या ठिकाणी सध्या टायगर सफारी अर्थात व्याघ्र प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी मोतीचंद सुरेशबाबु धरगशेट्टी 42 लाख 94 हजार 657 रुपये खर्च करणार आहेत.Zoo

 belgaum

कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधामामध्ये वाघ- सिंहापासून कोल्हे, अस्वल, बिबटे आदी प्राणी देखील ठेवले जाणार आहेत. मात्र या प्राण्यांचा संगोपनाचा खर्च फार मोठा आहे. या ठिकाणच्या व्याघ्र प्रकल्पाची जबाबदारी तर मोतीचंद सुरेशबाबु धरगशेट्टी यांनी घेतली आहेच. तथापि अन्य प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न अनुत्तरित असल्याने त्यांचे अधिवास निर्माण करण्यासाठी कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधाम व्यवस्थापनाला प्रचंड खर्च सोसावा लागणार आहे. यासाठी त्यांनी बेळगाव शहर परिसरासह उत्तर कर्नाटकातील समस्त दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे. सध्या यासंदर्भात निविदा मागविल्या जात असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

भूतरामहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधामाला सध्या ‘मिनी झू’चा दर्जा प्राप्त असून हे निसर्गधाम 34 हेक्टर प्रदेशात पसरले आहे. 1989 साली या ‘मिनी झू’ची स्थापना झाली. सदर मिनी झू अर्थात कनिष्ठ प्राणी संग्रहालय बुधवार सुट्टीचा दिवस वगळता दररोज सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश शुल्कासह सर्वांसाठी खुले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.